जळगाव समाचार डेस्क| ६ सप्टेंबर २०२४
आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात यंदा 162 गाव एक गणपती योजनेअंतर्गत एकत्रित गणेशोत्सव, 2004 सार्वजनिक गणेशोत्सव तर 705 खाजगी असे 2871 मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. पाचवा दिवस, सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी या प्रमुख दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे.
या गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, तसेच 1800 महिला व पुरुष होमगार्ड, 8 RCP प्लाटून, 2 QRT प्लाटून आणि SRPF कंपनी 1 यांच्यासह एकूण मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
गणेश भक्तांनी शांतता आणि आनंदात हा उत्सव साजरा करावा, तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

![]()




