दीड वर्षांपूर्वी नवे ट्रक्टर चोरी, त्यावरच वाळू व्यवसाय; आता अटक…

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगाव (Jalgaon) शहरातून सुमारे दीड वर्षांपूर्वी MIDC च्या D सेक्टर येथून एक नवीन ट्रॅक्टर चोरीस गेला होता. याबाबत अज्ञात चोरावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र या चोरी प्रकरणी तब्बल दीड वर्षांनी आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यास आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ट्रॅक्टर चोरी प्रकरणी एक खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. त्यांनी लागलीच आपल्या सहकाऱ्यांच्या पथकाला संबंधित आरोपीला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मौसीमखान अय्युबखान (२६) रा. शाहु नगर जळगाव याला पोलसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याला विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने १५ते १७ महीन्यापुर्वी एमआयडीसी डी सेक्टर भागातुन एका ट्रॅक्टर गोडावुन मधुन एक नवे ट्रॅक्टर चोरी केल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान त्याने हे ट्रॅक्टर आता जळगांव तालुका पोलीस स्टेशन मध्ये वाळु चोरीच्या गुन्हयात जप्त असल्याचे सांगितले, संबंधित आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करून पुढील एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई…
डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली व बबन आव्हाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या अधिनस्त पोलीस अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील यांच्या पथकाने हि कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here