त्या तस्करी प्रकरणातील आरोपीच्या 14 वर्षीय मुलाने केली आत्महत्या…

 

जळगाव समाचार डेस्क| ३ ऑगस्ट २०२४

वाघाच्या कातड्याच्या तस्करी प्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपी रहीम पवार याच्या मुलाने वडिलांना भेटू न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हलखेडा ता. मुक्ताईनगर येथे घडली आहे. सोम रहिम पवार (१४) असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. (Jalgaon)
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांनी नशिराबाद टोल नाक्याजवळ वाघाची कातडी घेऊन तस्करी करणाऱ्या ६ जणांना ताब्यात घेतले होते. दरम्यान या प्रकरणाच्या गुन्हा नेमका कसा घडवण्यात आला याच्या तपासासाठी काल २ ऑगस्ट रोजी सकाळी वन विभागाचा ताफा संशयित आरोपी रहिम पवार यांना घेऊन हलखेडा येथे पोहोचला होता, या वेळी संपूर्ण गाव जमा झाले होते. तपास कार्य पार पाडल्यानंतर हा ताफा निघून आला. मात्र वडिलांना भेटता न आल्यामुळे त्यांचा आठवीत शिकणारा लहान मुलगा सोम रहिम पवार याने घरासमोर असलेल्या कोंबड्याच्या शेडजवळ गळफास लावून आत्माहत्या केली.

सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या…

दरम्यान याबाबत माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी कुऱ्हा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले. मोठ्या मुश्किलीने दुपारी ३ वाजता त्यांनी सोमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेऊ दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here