जळगाव समाचार डेस्क | २७ जानेवारी २०२५
शिरसोली येथून पिंप्राळा येथे दोन गायी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे नेल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहनाचा पाठलाग करून गायींची सुटका करण्यात आली. या प्रकरणात तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी येथील जितेंद्र कोळी याने शिरसोली येथील शेख इब्राहीम शेख अब्बास यांच्या दोन गायी महिंद्रा पिकअप वाहनात भरून पिंप्राळा येथे नेत असल्याचे दिसून आले. हरिविठ्ठल नगरीतील दिनेश बारी आणि त्यांच्या मित्रांनी पाठलाग करून वाहन गिरणा पंपिंग परिसरात अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
चालकाकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर दिनेश बारी यांच्या तक्रारीवरून जितेंद्र कोळी, शेख इब्राहीम, आणि शेख मुशताक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शरद वंजारी करत आहेत.

![]()




