जळगाव समाचार डेस्क;
जुने जळगावातील एक भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरासमोर वारंवार चक्कर मारून व इशारे करून तिच्याकडे मोबाईल क्रमांक मागणाऱ्या 25 वर्षीय तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या गावातील एका भागात राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीच्या घरासमोरून मिहिर रमेश बारी (25), रा. मारुती पेठ या तरुणाने तीन, चार वेळा फेऱ्या मारून, घाणेरडे हातवारे करून मोबाईल क्रमांक मागितला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी मिहिर याला विचारणा केली. त्यावर त्याने त्यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जवळ असलेल्या कटरने मुलीच्या वडिलांच्या हातावर मारून दुखापत केली. याबाबत त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संज्ञा कलम 75, 118(1), 115(2), 352 तसेच बालकांची लैंगिक अपराधना पासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11(1),12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुबारक तडवी हे करीत आहे.

![]()




