जळगाव समाचार डेस्क;
घरात कोणीही नसतांना फायदा उचलत चोरट्यांनी बंड घरातून 50 हजार रोख रकमेसह तब्बल एक लाख ४१ हजारांचा ऐवज लाम्बाव्ल्याची घटना जळगाव शहरातील सुनंदिनी पार्क येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय असलेले दिनेश भगवान भालेराव (४४), रा. सुनंदिनी पार्क यांची मुलगी इगतपुरी येथे ध्यान साधना केंद्रात शिबिरासाठी गेली होती. तिला घेण्यासाठी १४ जून रोजी दिनेश भालेराव हे कुटुंबीयांसह गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील रोख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.
दरम्यान दि. १६ रोजी पहाटे साडेचार वाजता भालेराव कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना कुलूप तुटलेले दिसले, त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना सर्व सामान विखुरलेल्या स्थितीत दिसून आला. यावरून त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.