बी. जे. मार्केटजवळ दुभाजकावर दुचाकी आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क;

न्यू. बी. जे. मार्केट समोर दुभाजकावर एक भरधाव दुचाकी आदळल्याने 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(Jalgaon)

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटेनगर परिसरातील रहिवासी मयुर पाटील हा तरूण आपल्या आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगी यांच्यासह वास्तव्यास होता. त्याचे खोटेनगर स्टॉपवर दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असून तो वडीलांना गॅरेजवर मदत करीत होता. शनिवार दि. १३ जुलै रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास मयूर हा त्याच्या दुचाकीने बेंडाळे चौकातून पांडे चौकाकडे जात असतांना. नागोरी चहा समोरील दुभाजकावर दुचाकी आदळली. या भीषण धडकेत मयूरचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मयूरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here