वावडद्या जवळ डंपरची खाजगी बसला धडक; १० गंभीर…

जळगाव समाचार डेस्क। १ ऑगस्ट २०२४

राज्यासह शहरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अश्यातच आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास पाचोरा जळगाव रोडवरील वावडदा डोमगाव फाटानजीक भरधाव डंपरने खासगी बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील ८ ते १० प्रवाशी जखमी झाले आहे. (Jalgaon)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाचोऱ्याकडून जळगावकडे येणाऱ्या खासगी बसला (MH19 Y3359) समोर येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. हा अपघात वावडदा डोमगाव फाटानजीक घडला आहे. या अपघतात ८ ते १० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here