जळगावात पुन्हा डंपरने गाडीला उडवले; 5 गंभीर…

 

जळगाव समाचार डेस्क| २ ऑगस्ट २०२४

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अपघात काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. काल वावडदे येथील अपघाताच्या घटनेनंतर आज जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथे भरधाव डंपर आणि ओमनी कार ला भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना आज शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव येथे काही कामानिमित्त येत होते. दरम्यान सकाळी ११ वाजेच्या सुमारास सूनसगाव जवळून जात असतांना भरधाव डंपरने त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील प्रवाशांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी धाव घेऊन तात्काळ जखमींना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
यात जखमींची नावे पुढील प्रमाणे – विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (५२), कारकून रामदास देवराम मोरे (५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here