आशादीप वसतीगृहातून १९ वर्षीय तरुणी पसार…

 

जळगाव समाचार डेस्क | २७ जानेवारी २०२५

शहरातील आशादीप महिलांच्या वसतीगृहातून एका १९ वर्षीय तरुणीच्या पसार होण्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत ताब्यात असलेली ही तरुणी शनिवारी, २५ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वसतीगृहातील बाथरूमजवळील भिंतीवरून उडी मारून पसार झाली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर वसतीगृहाने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून भारतीय न्याय संहिता कलम २६३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरुणी पिटा कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात होती. शासकीय प्रक्रिया पूर्ण करून तिला आशादीप महिलांच्या वसतीगृहात ठेवण्यात आले होते. मात्र, तिने तेथून पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here