विविध मागण्यांसाठी जळगावात उद्या जेल भरो आंदोलन…

 

जळगाव समाचार | २४ सप्टेंबर २०२५

जळगाव शहरात उद्या गुरुवारी (दि.२५ सप्टेंबर) भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा (ओबीसी) मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीने जेल भरो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून दुपारी १२ वाजता होईल. त्यानंतर आंदोलकांचा मोर्चा नवीन बसस्थानक मार्गे स्वातंत्र्य चौकात पोहोचेल व तेथे सर्वांनी स्वखुशीने अटक देऊन जेल भरो आंदोलनात सहभाग नोंदवणार आहेत.

या आंदोलनाद्वारे ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी, बोधगया येथील महाविहार हे बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे, ओबीसी व इतर जातींची जातीनिहाय जनगणना, आदिवासी व मुस्लिम समाजावरील अन्यायाला पायबंद, पदोन्नतीत आरक्षण, शिष्यवृत्ती, महिला सुरक्षा, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, ओला दुष्काळ जाहीर करणे, शहरातील रस्ते व कचऱ्याचा बंदोबस्त करणे आदी २१ मुद्द्यांवर आवाज उठविला जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. देवानंद निकम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here