जळगाव समाचार | १७ मे २०२५
आयपीएल 2025 च्या हंगामाला पुन्हा सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी, भारतीय क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात संघ दोन प्रथम श्रेणी सामने आणि टीम इंडियाविरुद्ध एक सराव सामना खेळणार आहे.
संघाचे नेतृत्व बंगालचा अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन करणार असून, ध्रुव ज्युरेल उपकर्णधार असेल. मागील दौऱ्यात कर्णधार असलेला ऋतुराज गायकवाड यावेळी फक्त खेळाडू म्हणून निवडला गेला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, अनुभवी फलंदाज करुण नायर काही वर्षांनंतर संघात परतला आहे. त्याने गेल्या हंगामात 1,600 पेक्षा जास्त धावा करत 9 शतके झळकावली होती. त्याचप्रमाणे, इशान किशन यालाही दीड वर्षांनंतर पुन्हा संधी मिळाली आहे.
या दौऱ्यासाठी टीम इंडियातील काही नियमित खेळाडूंनाही इंडिया ‘अ’मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यात शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांची नावे प्रमुख आहेत. शुभमन गिल दुसऱ्या सामन्यापासून संघात सहभागी होणार आहे आणि त्याला नवा कसोटी कर्णधार बनवण्याची शक्यता आहे.
इंडिया ‘अ’ संघ – इंग्लंड दौरा 2025:
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव ज्युरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नितीशकुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर, इशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुभमन गिल* आणि साई सुदर्शन*
(*हे दोघे दुसऱ्या सामन्यापासून खेळणार आहेत)