टीम इंडियाच्या २०२४-२५ सालातील कराराची यादी जाहीर…

 

जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ‘सिनियर पुरुष संघ’ (Team India – Senior Men) करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांची ‘ग्रेड A+’ मध्ये कायम निवड झाली आहे.

ग्रेड A+ मध्ये हे चार खेळाडू
• रोहित शर्मा
• विराट कोहली
• जसप्रीत बुमराह
• रवींद्र जडेजा

ग्रेड A मध्ये सात खेळाडूंची निवड
• मोहम्मद सिराज
• के.एल. राहुल
• शुभमन गिल
• हार्दिक पंड्या
• मोहम्मद शमी
• ऋषभ पंत

ग्रेड B मध्ये पाच खेळाडू
• सूर्यकुमार यादव
• कुलदीप यादव
• अक्षर पटेल
• यशस्वी जैस्वाल
• श्रेयस अय्यर

ग्रेड C मध्ये तब्बल १९ खेळाडू
• रिंकू सिंग
• तिलक वर्मा
• ऋतुराज गायकवाड
• शिवम दुबे
• रवी बिश्नोई
• वॉशिंग्टन सुंदर
• मुकेश कुमार
• संजू सॅमसन
• अर्शदीप सिंग
• प्रसिद्ध कृष्णा
• रजत पाटीदार
• ध्रुव जुरेल
• सरफराज खान
• नितीश कुमार रेड्डी
• इशान किशन
• अभिषेक शर्मा
• आकाश दीप
• वरुण चक्रवर्ती
• हर्षित राणा

BCCI च्या वार्षिक करारामुळे खेळाडूंना मिळणारी रक्कम:
• ग्रेड A+: ₹७ कोटी
• ग्रेड A: ₹५ कोटी
• ग्रेड B: ₹३ कोटी
• ग्रेड C: ₹१ कोटी

या यादीतून काही नावाजलेले खेळाडू वगळण्यात आले असून, BCCI ने गुणवत्ता व सध्याच्या फॉर्मच्या आधारे निवड केली असल्याचे स्पष्ट केले आहे. आगामी आंतरराष्ट्रीय मालिका आणि T20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

ही निवड संघातील स्थिरता आणि भविष्यातील योजनांसाठी दिशादर्शक ठरू शकते. आगामी हंगामात कोणती नावे संघात आपली जागा पक्की करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here