जळगाव समाचार डेस्क | २७ सप्टेंबर २०२४
वेस्टर्न रेल्वे (WR) अंतर्गत बंपर भरती होणार असून, यासाठी 5066 अपरेंटिस पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), वेस्टर्न रेल्वे, मुंबई यांनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर जाऊन या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
अर्ज शुल्क किती?
जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
वयोमर्यादा काय आहे?
अपरेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा 15 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्षे आहे. वयोमर्यादेची गणना 22 ऑक्टोबर 2024 नुसार करण्यात येईल. ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षे, तर अनुसूचित जाती व जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे सूट दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड 10वी परीक्षेतील आणि आयटीआय प्रमाणपत्राच्या गुणांच्या सरासरीच्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या मेरिट लिस्टनुसार होणार आहे. दोन्ही परीक्षांना समान महत्त्व दिले जाईल. यानंतर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाची अपरेंटिसशिप ट्रेनिंग दिली जाईल आणि या कालावधीत त्यांना स्टायपेंड देखील दिला जाईल.