जळगाव समाचार | १५ फेब्रुवारी २०२५
भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी 21,413 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. इंडिया पोस्ट ऑफिसच्या वतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, इच्छुक उमेदवार 10 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल –
1. indiapost.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
2. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
3. सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
4. शुल्क भरून अर्ज अंतिम सबमिट करा.
या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना इतका पगार मिळणार…
• ब्रँच पोस्ट मास्टर (BPM) पदासाठी – ₹12,000 ते ₹29,380 वेतन
• असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक पदासाठी – ₹10,000 ते ₹24,470 वेतन
महत्त्वाची माहिती
• पदसंख्या – 21,413
• अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 फेब्रुवारी 2025
• अर्ज करण्याची अंतिम तारीख – 3 मार्च 2025
• अधिकृत वेबसाइट – indiapost.gov.in