जळगाव समाचार डेस्क। ५ ऑगस्ट २०२४
डाक विभागाने 44,228 पदांसाठी मेगाभरतीची घोषणा केली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात 3,170 पदांची भरती होणार आहे. या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक (जीडीएस – शाखा पोस्ट मास्टर) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्रता निकषांनुसार उमेदवाराने किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. मासिक वेतन ₹12,000 ते ₹29,380 पर्यंत असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.
उमेदवारांसाठी गणित आणि इंग्रजी या विषयांचे ज्ञान आवश्यक असून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच संगणकाचे ज्ञान असणेही आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे
https://indiapostgdsonline.gov.in/
या संकेतस्थळावर भरू शकता अर्ज.
जाहिरात येथे पहा
https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf
डाक विभागातील या मेगाभरतीमुळे अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.