भारत-पाकिस्तान संघर्ष शिगेला: कराची बंदरावर नौदलाचा हल्ला, देशभरात हाय अलर्ट


जळगाव समाचार | 9 मे 2025

भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव आता उघड युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई, जल आणि स्थलमार्गाने जोरदार हल्ले केले आहेत.

कराची बंदरावर नौदलाचा जोरदार हल्ला

भारतीय नौदलाने कराची पोर्टवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला केला असून या कारवाईत बंदरावर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आयएनएस विक्रांतवरून या हल्ल्याची कारवाई करण्यात आली. कराचीतील महत्त्वाच्या लष्करी व औद्योगिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.

भारतीय हवाई दलाकडून पाकच्या संरक्षणयंत्रणेवर हल्ले

भारतीय वायुदलाने लाहोर, फैसलाबाद, सरगोधा, मुलतान व सियालकोट येथील लष्करी तळांवर हवाई हल्ले करून पाकिस्तानची एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) उद्ध्वस्त केली. पाकिस्तानच्या ५ फायटर विमानांचीही भारताने यशस्वीपणे पाडणी केली आहे.

पाककडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न

पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हे सर्व हल्ले अचूकपणे परतवून लावले. भारताच्या S-400 संरक्षण प्रणालीने अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण

सांबा सेक्टरमध्ये ७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. उरी, पुंछ जिल्ह्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. जम्मूमध्ये सुरक्षा कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दिल्लीसह देशभरातील विमानतळ बंद

दिल्लीतील इंडिया गेट परिसर रिकामा करण्यात आला असून देशभरातील २७ विमानतळ तत्काळ बंद करण्यात आले आहेत. नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरोकडून सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी स्पष्ट केलं की, भारत-पाक संघर्ष हा अमेरिका थेट हस्तक्षेप करणार नाही असा विषय आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिका व इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधून भारताची भूमिका मांडली.

सुरतमध्ये हाय अलर्ट

गुजरातच्या सुरत शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून प्रमुख औद्योगिक युनिट्स, रेल्वे स्थानक व विमानतळांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

नागरिकांना आवाहन:
सरकारने नागरिकांना शांतता राखण्याचे व फसव्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीस अनुसरूनच कृती करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here