दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळले, 4 जण जखमी

 

नवी दिल्ली, जळगाव समाचार डेस्क;

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI Airport) टर्मिनल-1 वर छत कोसळले. अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळाच्या टर्मिनल-1 वर सकाळी 5.30 वाजता छत कोसळल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. छत कोसळल्याने काही गाड्यांचेही नुकसान झाले आहे. समोर आलेला व्हिडीओ पाहता, छत पडल्यामुळे गाड्यांचा चुराडा झाल्याचे दिसत आहे.

छत कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत
ताज्या माहितीनुसार, विमानतळावर छत कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानतळावर अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. छत कोसळल्याने कारचे नुकसान झाले तर एक व्यक्ती अडकली असल्याची माहिती समोर आली. जखमी प्रवासी की विमानतळ कर्मचारी हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
दिल्लीत पाऊस पडत आहे
आज पहाटेपासून दिल्लीत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे राजधानीच्या अनेक भागात पाणी साचले होते. पावसामुळे अनेक भागात वाहतुकीवर परिणाम झाला असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here