T-20 विश्वचषकात पॅट कमिन्सची पुन्हा हॅट्ट्रिक…

 

क्रीडा, जळगाव समाचार डेस्क;

T20 विश्वचषक 2024 (ICCT20MCWC) च्या Super-8 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 148 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत हॅटट्रिक घेत इतिहास रचला. (Cricket)
पॅट कमिन्सने सलग दोन सामन्यात हॅटट्रिक घेतली
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने गोलंदाजी करताना 4 षटकांत 28 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रशीद खानला बाद केले. यानंतर जेव्हा तो 20 वे षटक टाकायला आला तेव्हा त्याने पहिल्या चेंडूवर करीम जनात आणि दुसऱ्या चेंडूवर गुलबदिन नायबची विकेट घेतली. अशा प्रकारे त्याने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या शेवटच्या सामन्यात पॅट कमिन्सने बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्रिक साधली होती. T20 विश्वचषकाच्या इतिहासात दोन हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कोणीही हे करू शकले नाही. T20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 7 गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे.
T20 विश्वचषकाच्या इतिहासात या खेळाडूंनी हॅटट्रिक घेतली आहे
ब्रेट ली – विरुद्ध बांगलादेश (2007)
कुर्तिस कॅम्फर – विरुद्ध नेदरलँड्स (२०२१)
वानिंदू हसरंगा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२१)
कागिसो रबाडा – विरुद्ध इंग्लंड (२०२१)
कार्तिक मयप्पन – विरुद्ध श्रीलंका (२०२२)
जोशुआ लिटल – वि न्यूझीलंड (२०२२)
पॅट कमिन्स – वि बांगलादेश (२०२४)
पॅट कमिन्स – वि अफगाणिस्तान (२०२४)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here