जळगाव समाचार | १ मे २०२५
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकून साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. या अप्रतिम खेळीसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं आहे.
परंतु आयसीसीच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूचं वय किमान 15 वर्षं असावं लागतं. सध्या वैभवचं वय 14 वर्षे 34 दिवस आहे, त्यामुळे तो 27 मार्च 2026 नंतरच भारतासाठी खेळू शकेल.
त्याने अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असून, रणजी ट्रॉफीमध्येही बिहारकडून चांगली कामगिरी केली आहे. 2025 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 1.1 कोटींना विकत घेतलं होतं.
क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वैभवकडे असलेली प्रतिभा पाहता तो भविष्यात नक्कीच भारतासाठी खेळेल, पण त्यासाठी त्याला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल.