Monday, December 23, 2024
Homeक्राईमपुन्हा सैराट; खऱ्या प्रीन्स दादाने घेतला बहिणीचा जीव; व्हिडीओ करून स्वतः दिली...

पुन्हा सैराट; खऱ्या प्रीन्स दादाने घेतला बहिणीचा जीव; व्हिडीओ करून स्वतः दिली कबुली…

 

हरियाणा, जळगाव समाचार डेस्क,

हरियाणातील कैथलमध्ये प्रेमविवाह (Love Marraige) केल्याच्या रागातून (honor killing) अल्पवयीन भावाने बहिणीची हत्या (Murder) केली. ज्या हातावर बहीण (Sister) भवाला (Brother) राखी बांधत असे त्या हाताने तिचा जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भावाने बहिणीच्या सासरच्या घरात घुसून गोळीबार केला. गोळी लागल्याने नवविवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिची सासू आणि वहिनी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. ज्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहिणीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय आरोपी भावाला बुधवारी ताब्यात घेतले आहे.
महिलेच्या सासरच्यांनी पत्रकारांना सांगितले की, फेब्रुवारीमध्ये त्यांच्या मुलाचे लग्न झाले आहे. तेव्हापासून सुनेच्या घरच्यांकडून धमक्या येत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीने अनुसूचित जाती समाजातील मुलाशी लग्न केल्याचा राग आरोपीला होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने बहिणीच्या घरी जाऊन गोळीबार केला, ज्यामुळे बहिणीचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात सासू आणि वहिनी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चहा पीत असताना गोळी झाडली
या वर्षी फेब्रुवारीमध्ये नानकपुरी कॉलनीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलाशी लग्न केले. या प्रेमविवाहावर मुलीचे कुटुंबीय नाराज होते. या जोडप्याला न्यायालयाचे संरक्षणही मिळाले होते ते अनेक दिवस सेफ हाऊसमध्ये राहत होते. नुकतेच ते घरी राहायला आले होते. बुधवारी आरोपी त्याच्या बहिणीला भेटायला आला आणि दोघांनी तासभर चर्चा केली. आरोपीने बहिणीच्या हाताचा चहाही प्यायला. मात्र चहा संपताच त्याने गोळीबार केला. आरोपी यापूर्वीही बहिणीच्या सासरच्या घरी आला होता. त्यामुळे त्याच्या हेतूवर कोणालाच शंका आली नाही.
पिस्तूल फिरवत गुन्ह्याची कबुली दिली
हत्येनंतर आरोपीने एक व्हिडिओही जारी केला. ज्यामध्ये तो पिस्तूल (Pistel) फिरवताना दिसला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page