जळगाव समाचार डेस्क;
हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणामुळे जळगाव (Jalgaon) शहर पुन्हा हादरले आहे. जळगाव शहरातील मेहरून परिसरामध्ये पाच महिला घरासमोर गप्पा मारीत असताना भरधाव वेगात असणाऱ्या कारने पाच महिलांसह २ चिमुरड्या बालकांना उडवले, या घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात सायंकाळी साडेसहा वाजता काही महिला गप्पा मारीत आपल्या घरासमोर उभ्या होत्या. रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार यारस्त्याने आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने घरासमोर उभ्या असलेल्या या महिलांना धडक देत उडविले. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात दूध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील(60) यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे यात एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्यासह दुखापत झाली असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. दरम्यान जमावाने कार चालकाला चांगलाच चोप दिला. या सदर घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मयात शोभा रमेश पाटील यांच्या पश्चात दिव्यांग पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.