Monday, December 23, 2024
Homeक्राईमब्रेकिंग : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तीन जण ठार

ब्रेकिंग : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तीन जण ठार

पुणे-बावधन परिसरातील केके राव डोंगराळ परिसरात आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती कळतच हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते, त्यामध्ये कोण प्रवास करत होते? या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

पिंपरी -चिंचवडच्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. पुणे पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page