जळगाव, जळगाव समाचार डेस्क;
सौदी अरेबिया येथे पवित्र हज (Hajj) यात्रेसाठी अनेक भाविक तेथे पोहोचले आहेत. मात्र तेथे उष्माघाताने हाहाकार माजवला असून आतापर्यंत हजारांच्या नाचही समावेश आहे. या घटनेत जळगाव शहरातील दोन भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान कायदेशीर कार्यवाही झाल्यावर मृतदेह भारतात येणार असल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली. त्यांच्या अकाली निधनामुळे जळगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील उस्मानिया पार्क भागामध्ये डॉ. उमर देशमुख हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे वडील अब्दुल रफिक देशमुख (६५) आणि आई शाहीन बेगम अब्दुल रफिक देशमुख (६१) हे यंदा पवित्र हज यात्रेला गेले आहेत. तेथे शाहीन बेगम यांची प्रकृती खराब झाली. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.
त्याच बरोबर पिंप्राळा हुडको परिसरातील गुलशन रजा कॉलनी येथे वास्तव्यास असणारे अकमल खान अफजल खान (५४) हे पत्नी शबानाबी खान यांच्यासह हज यात्रेला गेलेले होते. सौदी अरेबिया येथे मीना परिसरात त्यांना चक्कर आली. त्याठिकाणी काही वेळ पत्नी शबानाबी यांच्यापासून त्यांची ताटातुट झाली. मात्र थोड्यावेळाने शबानाबी यांनी पाहिले तर अकमल खान यांना चक्कर आल्यानंत त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. अकमल खान हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील नॅशनल उर्दू हायस्कुल येथे शिक्षक आहेत.
जळगाव जिल्हा प्रशासनाकडे अद्याप याबाबत कुठलीच अधिकृत माहिती प्राप्त झाली नसल्याचे दिसून आले आहे. दरम्म्यान, दोन्ही मृतदेह पुढील ८ दिवसांनी भारतात येईल अशी माहिती मिळाली आहे.