जळगाव समाचार | १२ मार्च २०२५
धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ जणांना तीन दिवसांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी हा आदेश दिला असून, हे व्यक्ती १२ मार्चपासून १५ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात प्रवेश करू शकणार नाहीत.
रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या वतीने या १४ जणांविरोधात अहवाल तयार करून हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार, धुलिवंदनाच्या सणादरम्यान संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला. हद्दपारीच्या कालावधीत हे व्यक्ती शहरात आढळल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हे १४ जण हद्दपार
१) राकेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा)
२) किरण अशोक सपकाळे (हुडको, पिंप्राळा)
३) सचिन अभयसिंग चव्हाण (गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा)
४) जय राजेंद्र सैंदाणे (समतानगर)
५) दानिश बाशीत पिंजारी (खंडेरावनगर)
६) झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (राजीव गांधीनगर)
७) समीर सलीम शेख (आझादनगर)
८) राम उर्फ बारकू संतोष भोई (खंडेरावनगर)
९) लखन संतोष भोई (खंडेरावनगर)
१०) सागर कपील भोई (खंडेरावनगर)
११) दत्तू विश्वनाथ कोळी (म्युन्सिपल कॉलनी)
१२) अक्षय उर्फ गंम्प्या नारायण राठोड (पिंप्राळा)
१३) नितेश मिलिंद जाधव (मढी चौक)
१४) इच्छाराम पुंडलिक वाघोदे (समतानगर)
कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रशासन सतर्क…
होळी आणि धुलिवंदन सणादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. संभाव्य गडबड करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई केली जात आहे. नागरिकांनी सणाचा आनंद घेताना शिस्त व शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.