नाकाबंदी दरम्यान बऱ्हाणपूरकडून येणारा 22 लाखां चा गुटखा पकडला

रावेर-मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून अवैधरित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुमारे 22 लाखांचा गुटखा चोरवड नाक्याजवळ पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी पोलिसांनी वाहन आणि दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की चोरवड नाका येथील नाकाबंदी दरम्यान मध्यरात्री दीड वाजता सुमारास एका महिंद्रा बोलेरो या चार चाकी वाहनातून संशयित रिजवान शेख रऊफ वय 28 व त्याच्या सोबत असणारा शेख शोएब शेख शरीफ व 27 दोन्ही राहणार छत्री चौक पठाणवाडी फैजपूर तालुका यावल हे महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला विमल गुटख्याचा साठा घेऊन जात असताना आढळून आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी अरुण नावाच्या व्यक्तीकडून हा गुटख्याचा माल घेतला असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी 22 लाख 160 रुपये किमतीचा मुद्ददेमाल हस्तगत केला. दोघांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी अंकुश जाधव करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here