कोण खरा निष्ठावंत? देवकर की पाटील; दोन गुलाबरावांची निष्ठा मतदार ठरवतील…

जळगाव समाचार डेस्क | २४ ऑक्टोबर २०२४

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात या वेळी गुलाबराव देवकरांना जिंकण्याची मोठी संधी मिळाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर, या निवडणुकीत आपली साक वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांचे सर्वस्व पणाला लागले आहे. गुलाबराव देवकर हे माजी मंत्री असून, त्यांचा राजकीय अनुभव आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील तालमीतून मिळालेले शिक्षण त्यांना या निवडणुकीत मजबूत उमेदवार बनवते.

गुलाबराव देवकर यांची सौम्य स्वभावासाठी ओळख असून, त्यांच्या उमेदवारीने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. या निवडणुकीत आजी आणि माजी मंत्र्यांच्या निष्ठेची जोरदार चाचणी होईल, हे निश्चित आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटलांना यावेळी तगडं आव्हान मिळेल, अशी चर्चा होत आहे. मतदारसंघातील नागरिकांमध्ये निष्ठावंत नेत्यालाच आमदार म्हणून निवडण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत, ज्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

गुलाबराव देवकरांसाठी ही निवडणूक त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते, आणि मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाखालील प्रचाराला उभारी मिळाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here