गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार स्वीकारला…

जळगाव समाचार डेस्क| ३ जानेवारी २०२५

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी तिसऱ्यांदा याच पदावर नियुक्ती झाल्यानंतर 1 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील विभागाच्या कार्यालयात औपचारिक पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी वणी येथे सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिलेल्या संधीबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पाणीपुरवठा समस्या सोडवणे आणि स्वच्छता मोहिमेला गती देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असेल.”

पदभार स्विकारताना विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अभियान संचालक ई. रविंद्रन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here