जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५
७ एप्रिल रोजी शेअर बाजारात ३००० अंकांची मोठी घसरण झाली. याचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या दरांवर झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹२६१३ ने घसरून ₹८८,४०१ झाले आहेत. यापूर्वी ही किंमत ₹९१,०१४ होती. चांदीच्या दरातही ₹४५३५ इतकी घट झाली असून, सध्या चांदी ₹८८,३७५ प्रति किलो दराने मिळते.
या वर्षी सोन्याने सुमारे १९% परतावा दिला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात झालेल्या तोट्याची भरपाई करण्यासाठी सोनं विकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोन्याची विक्री वाढली असून दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.
जगभरात सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे सोन्याची मागणी अजूनही आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ₹९४,००० च्या पुढे जाऊ शकतात अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा:
• नेहमी BIS हॉलमार्क असलेलेच सोने घ्या
• त्या दिवशीचा अचूक दर आणि वजन तपासा
• रोख न देता UPI किंवा कार्डने पेमेंट करा आणि बिल जरूर घ्या
जळगावमध्ये आजचे सोने दर (७ एप्रिल २०२५):
• २२ कॅरेट: ₹८३,७५० प्रति १० ग्रॅम
• २४ कॅरेट: ₹८७,९४० प्रति १० ग्रॅम
दररोज सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होतात, त्यामुळे खरेदीपूर्वी स्थानिक दर तपासणे आवश्यक आहे.