जळगाव समाचार | २९ मार्च २०२५
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या दरांनी पुन्हा मोठी उसळी घेतली असून, पहिल्यांदाच सोने 92 हजार रुपयांवर तर चांदी 1 लाख 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
सोन्या-चांदीचे सध्याचे दर
• सोने (विना जीएसटी): 89,700 रुपये प्रति 10 ग्रॅम
• चांदी (विना जीएसटी): 1,02,000 रुपये प्रति किलो
• जीएसटीसह सोने: 92,000 रुपये प्रति 10 ग्रॅम
• जीएसटीसह चांदी: 1,05,000 रुपये प्रति किलो
IBJA नुसार सोने दर (प्रति 10 ग्रॅम):
• 24 कॅरेट: 89,164 रुपये
• 23 कॅरेट: 88,807 रुपये
• 22 कॅरेट: 81,674 रुपये
• 18 कॅरेट: 66,873 रुपये
• 14 कॅरेट: 52,161 रुपये
• चांदी (1 किलो): 1,00,892 रुपये
सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, रशिया-युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय आणि 2 एप्रिलला यूएसए च्या सेलिब्रेशन दिवसामुळे लागु होणाऱ्या ट्रारिफ रेट्स या कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीच या वाढीमुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे, कारण अनेक जण सणानिमित्त सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी बाजारात येतात.