जळगाव, जळगाव समाचार डेस्क;
सुवर्ण नगरीसह देशभरात काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अनेक विक्रम गाठतांना दिसत आहेत. चांदी तब्बल लाखाच्या जवळपास पोहोचली असतांना अनेकांनी चांदी लाखाच्या पार जाईल कि काय अशे अनुमान लावले होते. सोबतच सोनीही अगदी झळाळी घेत पंच्याहत्तर हजारापार पोहोचले होते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा सोन्याच्या किमतींनी हैराण दिसून येत होता.
पण गेल्या गेल्या 10 दिवसांपासून चांदीच्या दरात जळगावमध्ये सुमारे 5 हजार रूपयांची घसरण झाली आहे, तर सोन्याच्या दरात नाममात्र 120 रूपयांची घट झाली आहे. त्यानुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 72 हजार 550 रूपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 6,650 रूपये प्रती ग्रॅम तर चांदीचे दर हे 91 हजार रूपये प्रतिकिलो आहेत. चांदीचे दर हे 90 हजार रूपयांच्या खाली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. गेल्या 10 दिवसात चांदीचे दर हे तब्बल चार वेळा घसरले आहेत हे विशेष.