जळगाव समाचार | २१ एप्रिल २०२५
लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आणि गुंतवणूक म्हणून सोनं घेणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरामुळे आज सोन्याचा दर प्रति तोळा 1,01,400 रुपये झाला आहे. ही किंमत आतापर्यंतची सर्वाधिक असून, ग्राहकांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होणार आहे.
सध्या चीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्ध सुरु आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे आणि मंदी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच कारणामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. तज्ज्ञांच्या मते, जास्त परताव्यासाठी सोनं हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे मागणी वाढत चालली असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.
सोनं खरेदी करताना किंवा गुंतवणुकीसाठी निवडताना योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत दर अधिक वाढू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने आपली गरज आणि बजेट लक्षात घेऊनच खरेदी करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.