जळगाव समाचार डेस्क| २४ जुलै २०२४
काल संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात सीमाशुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याच्या अंमलबजावणीपूर्वी नुसत्या घोषणेमुळे सोने-चांदीच्या (Gold – Silver)भावात विक्रमी घसरण दिसू लागली. सोने तब्बल 2 हजार 800 रुपयांनी घसरले तर चांदीही 3 हजार 800 रुपयांनी घसरली आहे. यामुळे सोन्याचे नवे दर हे प्रतितोळा ७० हजार ७०० रुपये तर चांदी ८५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे. (Jalgaon)
सुवर्ण व्यावसायिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदीवरील सीमाशुल्क कमी करण्याची मागणी केली जात होती. अखेर त्या मागणीला हिरवा कंदील दाखवत केंद्रीय अर्थसंकल्पात सीमाशुल्क १२.५ टक्क्यांवरून ६.५ टक्के करण्यात आले. या घोषणेच्या अंमलबजावणीनंतर सोन्याचे दर सरासरी पाच हजार तर चांदीचे दर सरासरी सात हजारांनी कमी होऊ शकतात.
जळगावात आजचे भाव
22 कॅरट सोने – 6494/-
24 कॅरट सोने – 7,085/-

![]()




