जळगाव समाचार | २६ मार्च २०२५
गेल्या आठवड्यात जोरदार वाढ झाल्यानंतर या आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली, तर चांदीचा दर स्थिर राहिला.
गेल्या आठवड्यात सोने 1100 रुपयांनी महागले होते. मात्र, या आठवड्यात घसरण सुरू झाली असून सोमवारी 210 रुपये आणि मंगळवारी 330 रुपयांची घट झाली. यामुळे आता 22 कॅरेट सोन्याचा दर 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 89,440 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या एक किलो चांदीचा दर 1,01,000 रुपये आहे. यापूर्वी चांदीच्या किमतीत 4100 रुपयांची घट झाली होती.
आज सकाळचे नवे दर (IBJA नुसार)
• 24 कॅरेट सोने – ₹87,751 प्रति 10 ग्रॅम
• 23 कॅरेट सोने – ₹87,400 प्रति 10 ग्रॅम
• 22 कॅरेट सोने – ₹80,380 प्रति 10 ग्रॅम
• 18 कॅरेट सोने – ₹65,813 प्रति 10 ग्रॅम
• 14 कॅरेट सोने – ₹51,334 प्रति 10 ग्रॅम
• चांदी (1 किलो) – ₹97,922
किंमतीत तफावत का?
आंतरराष्ट्रीय बाजारात आणि वायदे बाजारात सोने-चांदीवर कोणतेही कर किंवा शुल्क लागत नाही. मात्र, स्थानिक सराफा बाजारात कर आणि शुल्काचा समावेश होत असल्याने दरात थोडी तफावत दिसून येते.