भुजमध्ये 500 फूट खोल बोरवेलमध्ये युवती पडली; बचावकार्य सुरू

जळगाव समाचार डेस्क | ६ जानेवारी २०२५

गुजरातमधील भुज येथे कंडेराई गावात एक युवती ५०० फूट खोल बोरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. हा अपघात सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलिस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

सकाळी ६ वाजता घरातील सदस्यांना बोरवेलमधून मदतीसाठी हाका ऐकू आल्या. त्यांनी पाहिले असता युवती बोरवेलमध्ये अडकली असल्याचे स्पष्ट झाले. सुमारे अर्धा तास या हाका ऐकू येत होत्या, त्यानंतर आवाज बंद झाला.

घटनास्थळी अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले असून एसडीएम आणि पोलिस अधिकारीही उपस्थित आहेत. गांधीनगर येथून एनडीआरएफची टीम लवकरच दाखल होणार आहे. सध्या बोरवेलमध्ये अडकलेल्या युवतीला ऑक्सिजन सपोर्ट दिला जात आहे. कॅमेऱ्याद्वारे युवती दिसत असून तिला सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here