जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२५
भारताच्या इंधन क्रांतीला नवे वळण! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, इथेनॉल-डिझेल मिश्रण अपयशी ठरल्याने आता डिझेलमध्ये १०% आयझोब्यूटानोल मिसळले जाईल. हे जैवइंधन प्रदूषण ३०% कमी करेल आणि देशाच्या २२ लाख कोटींच्या तेल आयातीला धक्का देईल! ARAI चे प्रयोग यशस्वी होताच कॅबिनेट मंजुरी मिळेल, आणि ट्रॅक्टर-बांधकाम यंत्रणांमध्येही हे क्रांती घडवेल.
“इथेनॉल डिझेलमध्ये चालले नाही, पण आयझोब्यूटानोल हे इंजिन-फ्रेंडली आहे. शेतकऱ्यांना नवीन बाजार, कमी प्रदूषण आणि स्वस्त इंधन – हा सस्टेनेबल भारताचा मार्ग!” – गडकरींचे उद्गार. मका शेतकऱ्यांना E20 ने ४५,००० कोटी मिळाले, आता आयझोब्यूटानोलने आणखी लाखो कोटींचा बूस्ट!