जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२५
शहरात सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने दोन जणांनी युवकाला बॅट आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी सिंधी कॉलनीतील संत कंवरराम प्रायमरी स्कूलसमोर घडली.
जयेश जयप्रकाश जेवलानी (३०, रा. सिंधी कॉलनी) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीला संशयित साहील मकडीया याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. याचा जाब विचारण्यासाठी जयेश जेवलानी गेले असता, नितीन मकडीया आणि साहील मकडीया यांनी त्यांच्यावर हल्ला केला. नितीन मकडीयाने बॅटने डोक्यावर वार केला, तर साहील मकडीयाने लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
गंभीर जखमी झालेल्या जेवलानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार ईश्वर लोखंडे तपास करत आहेत.

![]()




