पार्ट टाइम जॉबसह नफ्याचे अमिष, तरुणाला सहा लाखांचा गंडा

जळगाव -पार्ट टाइम जॉब देण्याचे आणि टास्कमधून परतावा देण्याचे अमिष दाखवत  तरुणाची ६ लाख ११ हजारात ऑनलाईन फसवणुक केली. ही घटना दि. ९ ते दि. ११ ऑक्टोंबर रोजी घडली, याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात ऑनलाईन फसवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील शाहरुख पिंजारी याला

दि. ९ ऑक्टोंबर रोजी  तीन तीन जणांनी व्हाट्सअप आणि टेलिग्रामवर संपर्क साधून त्यांना ‘पार्ट टाईम जॉब’ देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर गुगल मॅपवर रिव्यू रेटिंग देण्याचे तसेच एका कंपनीचे शेअर खरेदी करून ते विकण्याचे टास्क दिले. त्यासाठी त्यांना एक लिंक पाठवून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर रिव्हा रेटिंग टास्कचे २०० रुपये व गुंतवलेल्या चार हजार २० रुपये यावर नफा असे एकूण ६ हजार १२७ रुपये परतावा दिला. त्यातून पिंजारी यांचा त्यांनी विश्वास संपादन करीत अधिक नफ्याचे अमिष पढले महागात गुंतवणूक केलेल्या पैशांवर अधिकचा नफा मिळत असल्याने पिंजारी यांनी वेळोवेळी ५ लाख ९१ हजार ८४४ रुपये ऑनलाईन गुंतवणुक केली, मात्र परतावा मिळत नसल्याने त्यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. सायबर पोलिसात गुन्हा दाखल या प्रकरणी शाहरुख पिंजारी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसणूक करणाऱ्या तीन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here