Monday, December 23, 2024
Homeजळगाव ग्रामीणकमळगाव येथे पाणीपुरीमुळे ८० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा...

कमळगाव येथे पाणीपुरीमुळे ८० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा…

 

जळगाव समाचार डेस्क;

चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी अनेकांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल ८० पेक्षा जास्त लोकांना आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने हि समस्या झाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र बाहेरील खाद्यापादार्थाविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारा निम्मिताने आजूबाजूच्या खेड्यांतील गावकरी येत असतात. तसेच यावेळीही बाजारासाठी चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते. दरम्यान बाजारात पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. या पाणीपुरी खाल्लेल्यांना मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी ६ वाजेनंतर अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली. तर सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे.
घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली.
या ठिकाणाहून ७० पैकी ३० रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे १० रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते. यापैकी डिंपल कोळी (१६), आयर्न सपकाळे (७), पवन सोनवणे (१३), निकिता कोळी (१३), चेतना सपकाळे (१९) यांच्यासह ३० जणांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पुढील उपचारासाठी (Treatment) हलविण्यात आले.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page