जळगाव समाचार | ५ मे २०२५
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात एका लग्नसमारंभात तंदूरी रोटीवरून वाद झाला आणि या वादात दोन युवकांचा मृत्यू झाला. बलभद्रपूर गावात शनिवारी संध्याकाळी रामजियावन वर्मा यांच्या मुलीचं लग्न होतं. सर्व विधी सुरू असताना जेवणाच्या वेळी १८ वर्षीय रवी कुमार आणि १७ वर्षीय आशिष कुमार यांच्यात रोटीवरून वाद झाला.
हा वाद लवकरच हाणामारीत बदलला. लाठी-काठ्यांनी झालेल्या झटापटीत आशिषचा जागीच मृत्यू झाला. रवीला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं, पण वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवले असून, तपास सुरू आहे. तक्रारीच्या आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.