ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन…

जळगाव समाचार डेस्क;

ज्येष्ठ साहित्यिक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा पर्यावरणवादी चळवळीतील कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज सकाळी पहाटे ५ च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी वसईतील त्यांच्या राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. वसईतील जेलाडी या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. परंतु दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले आहे. आज संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सांयकाळी ४ पासून त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here