जळगाव समाचार | २१ ऑक्टोबर २०२५
जिल्ह्याच्या राजकारणात एक दुःखद घटना घडली आहे. चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगावसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजीवदादांना सकाळी अचानक अस्वस्थता जाणवली. तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली.
राजीव दादा देशमुख यांनी आमदार म्हणून कार्यरत राहून चाळीसगाव मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली होती. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार चाळीसगाव येथे होणार असून यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

![]()




