जळगाव समाचार | १७ फेब्रुवारी २०२५
एरंडोल तालुक्यातील तळई येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत गोकुळ महाजन आणि दादाजी महाजन या दोघा भावांची घरे पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी टळली, पण दोघांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे.
ही घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री २.३० ते ३.०० वाजेच्या सुमारास घडली. घरात अचानक धूर भरल्याने कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि त्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ धावून आले. मात्र, आग इतकी भीषण होती की, ती आटोक्यात आणता आली नाही. काही वेळातच दोन्ही घरे जळून खाक झाली.
या आगीत सर्व सामान जळून गेले असून, दादाजी महाजन यांच्या मुलाचे शैक्षणिक कागदपत्रे व लॅपटॉपही नष्ट झाले. दोघांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आता त्यांना मोठे संकट आले आहे. ग्रामस्थांनी शासन व लोकप्रतिनिधींनी या कुटुंबांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.