जळगाव समाचार | २० ऑगस्ट २०२५
वरखेडी (ता. एरंडोल) येथे आज दुपारी (२० ऑगस्ट) सुमारास झालेल्या दुर्देवी घटनेत पाच जणांचा करुण मृत्यू झाला.
शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास या तारांमधून आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसून दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, मृतदेह पुढील कार्यवाही व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.