जळगाव समाचार | ३० मार्च २०२५
महावितरणाने २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी विजेच्या दरात १२ ते २३ टक्के कपातीचा प्रस्ताव मांडला होता, जो आता प्रत्यक्षात येणार आहे. यामुळे उद्योगांना मोठे प्रोत्साहन मिळणार असून, महाराष्ट्रातून उद्योगांचे स्थलांतर थांबेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सौरऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज पुरवठ्याचा सरासरी दर ९.४५ रुपयांवरून ९.१४ रुपये प्रति युनिटपर्यंत खाली येणार आहे.” जळगावातील लघुउद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “आमच्या उत्पादन खर्चात कपात होईल आणि स्पर्धेत टिकून राहणे सोपे होईल,” असे एका उद्योजकाने सांगितले.