शेतात वडिलांना मदतीसाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

 

जळगाव समाचार डेस्क;

सध्या पावसाच्या आगमनामुळे शेतीकामांना गती मिळाली आहे, त्यामुळे सर्वत्र शेतीकामे जोरात सुरु आहेत. मात्र अश्यातच पाचोरा तालुक्यायून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात वखर चालवतांना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटल्याने वखरला वायरच्या तारांचा स्पर्श (Electric Shock) झाल्याने एका १७ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Farm) याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील वणगाव येथील प्रमोद विष्णू जंजाळ (१७) हा युवक शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. २८ जून रोजी सकाळी शेतात वखर चालवायचे असल्याने आई, वडिलांसोबत तो शेतात गेला होता. दरम्यान, प्रमोद हा शेतात लोखंडी वखर चालवत असताना त्यांच्या शेतातून शेजारील शेतासाठी विजेची वायर जमिनीवरुन टाकण्यात आली होती. ही वायर प्रमोद याच्या निदर्शनास आली नाही. नेमके वखरमुळे ही वायर तुटली व वायरच्या तारांचा स्पर्श वखरला झाला. तर प्रमोद याच्या हातात वखरचा दांडा असल्याने त्यास विजेचा जबर धक्का लागला व त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार शेजारी काम करणाऱ्या त्याच्या वडिलांच्या लक्षात येताच ग्रामस्थांच्या मदतीने प्रमोद यास तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन प्रमोद यास मृत घोषित केले.
एकुलता एक मुलगा गेल्याने आई वडिलांनी एकच आक्रोश केला. या दृश्याने सर्वांचे मन हेलावून गेले. मयत प्रमोद याच्या पश्चात्य आई, वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे. कष्टाळू व मेहनती तसेच अभ्यासात हुशार अशा प्रमोदच्या अकस्मात मृत्यूने वणगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस ठाण्यात वर्ग केली आहे.
मयताच्या वडिलांची प्रतिक्रिया
शेजारच्या शेतकऱ्याने विष्णू जंजाळ यांच्या शेतातून थेट जमिनीवरुच विजेची वायर टाकल्याने माझ्या निष्पाप मुलास जीव गमवावा लागल्याची माहिती माध्यमांशी बोलताना विष्णु जंजाळ यांनी स्वतः दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here