जळगाव समाचार डेस्क
राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अखेर राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
राज्यातील सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आता प्रचारात उतरणार आहेत. मतदानासाठीची तारीख जाहीर झाल्याने जनतेत उत्सुकता आहे, तर उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि राज्याची सत्ता कोणाच्या हातात जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.