जळगाव समाचार डेस्क| १४ सप्टेंबर २०२४
राज्य शासनाने जाहीर केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी यंदा सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र, अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या ईद-ए-मिलादच्या निमित्ताने सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या मिरवणुका बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, जळगाव जिल्ह्यातील ईद-ए-मिलादची सोमवारची सुट्टी रद्द करून, ती बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या निर्णयाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
मुंबई शहर आणि उपनगर वगळता, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मिरवणुकांच्या तारखांनुसार सुट्टीचा निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.