जळगाव समाचार डेस्क | १ नोव्हेंबर २०२४
एरंडोल विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणारे पारोळा येथील डॉ. संभाजीराजे पाटील यांना मिळणारा जनसमर्थनाचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. गेल्या २-३ वर्षांपासून डॉ. पाटील यांनी मतदारसंघात मजबूत संपर्क निर्माण केला आहे. दोन तालुके आणि एका जिल्हा परिषद गटात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामाने त्यांना समाजसेवक म्हणून प्रतिष्ठा मिळाली आहे.
डॉ. संभाजीराजे पाटील वैद्यकीय व्यवसायात कमी आणि सामाजिक कार्यात अधिक सक्रिय आहेत. त्यांनी विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून अनेक गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी मतदारसंघात डोळ्यांचे मोफत तपासणी शिबिरे घेतली आहेत, ज्यातून अनेक रुग्णांना लाभ झाला. याशिवाय, त्यांनी अनेक रुग्णांना वैयक्तिकरीत्या मदत केली आहे.
आपली उमेदवारी मतदारसंघातील रोजगार, सिंचन समस्या, गावागावांतील रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मतदारसंघात त्यांना मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारांमध्ये बोलले जात आहे. सरकार दरबारी त्यांची चांगली ओळख असल्याने याचा मतदारसंघाला लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी एरंडोल मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता असून, मतदारसंघात परिवर्तन होईल, असा अंदाज मतदारांच्या चर्चेमध्ये व्यक्त होत आहे.