जळगाव समाचार डेस्क | ११ नोव्हेंबर २०२४
एरंडोल विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांना गावागावातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मतदारसंघात सतत संपर्क ठेवत त्यांनी जनतेशी दृढ संबंध निर्माण केले आहेत. मतदारसंघातील एरंडोल, कासोदा, पारोळा यांसह इतर गावांमध्ये जनतेत त्यांची विशिष्ट ओळख बनली आहे.
डॉ. संभाजीराजे पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून समाजसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या डॉ. संभाजीराजे फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. तसेच, कोरोना काळात त्यांनी जवळपास तीन ते चार हजार गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली, ज्यामुळे समाजात त्यांचा आदर वाढला आहे.
त्यांच्या या कार्याचा प्रभाव मतदारसंघात स्पष्टपणे जाणवत असून, मतदारांचा त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता विरोधकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. “सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार” म्हणून डॉ. संभाजीराजे पाटील यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, मतदारसंघातील लोकांमध्ये त्यांना पाठिंबा देण्याची भावना वाढीस लागली आहे.